AI माहितीच्या मर्यादा

निष्कर्ष वाचा. त्यातून काय ठरत नाही तेही जाणून घ्या.

फोटो, तुम्ही दिलेली माहिती आणि उपलब्ध स्रोतांवरून DermaScanAI स्पष्टीकरण देते. त्यातून निदान किंवा उत्पादन तुमच्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री मिळत नाही.

अ‍ॅपमधील सुविधा

फोटो संपूर्ण परिस्थिती सांगत नाही

प्रकाश, कोन, फिल्टर आणि फोकसमुळे रंग किंवा पोत वेगळा दिसू शकतो. वेदना, गरम वाटणं किंवा कालावधी फोटोवरून ठरत नाही. AI महत्त्वाची गोष्ट चुकवू शकते किंवा चुकीचा अर्थ लावू शकते.

गरजेचा वैद्यकीय सल्ला पुढे ढकलू नका

नवीन किंवा बदलत असलेलं लक्षण, वेदना, रक्तस्राव, न भरणारी जखम किंवा काळजी असल्यास पात्र डॉक्टरांना भेटा. तातडीच्या परिस्थितीत अ‍ॅपच्या उत्तराची वाट पाहू नका.

उत्पादनातही संदर्भ महत्त्वाचा

नाव एकच असून प्रदेशानुसार फॉर्म्युला किंवा आवृत्ती वेगळी असू शकते. घटकयादीवरून तुमची वैयक्तिक प्रतिक्रिया ठरत नाही. पॅकवरील वापर आणि खबरदारी वाचा; शंका असल्यास आरोग्य व्यावसायिकांना विचारा.

वापरण्यापूर्वी जाणून घ्या

नेहमीचे प्रश्न

काही ठळक दिसलं नाही तर डॉक्टरांकडे जायची गरज नाही का?

तसं समजू नका. फोटोवर न दिसणं म्हणजे आजार नाही अशी खात्री नव्हे. टिकून राहणारी लक्षणं, नवीन बदल किंवा काळजी असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

त्वचेचं प्रत्येक वैशिष्ट्य बदलायलाच हवं का?

नाही. नैसर्गिक ठिपके किंवा पोत म्हणजे प्रत्येक वेळी आजार नाही. माहिती समजून घेण्यासाठी आहे; प्रत्येक वैशिष्ट्य दोष मानून बदलायला सांगण्यासाठी नाही.

माहितीचे स्रोत

IPHONE आणि ANDROID वर

तुमच्या प्रश्नापासून अ‍ॅपमध्ये सुरुवात करा

त्वचेचा फोटो पाहा, उत्पादन समजून घ्या किंवा तुमच्या गरजा आणि आवडीनुसार दिनचर्या तयार करा. DermaScanAI iPhone आणि Android वर उपलब्ध आहे.

माहितीसाठी; वैद्यकीय निदान नाही.